दोन जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या म्होरक्यासह टोळीला बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त…
उरुळी कांचन : आंतरजिल्हा दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीप्रमुखासह त्याच्या साथीदारांना स्थनिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १७ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजय उल्हास्या काळे (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर), गणेश सुरेश भोसले (वय २८, रा. – वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि. बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर), पावल्या ऊर्फ देवा कैलास काळे), तुषार ऊर्फ विशाल कैलास काळे), शरद कैलास काळे, (रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी चोरलेले सोने हे किरण भाऊसाहेब बेद्रे (वय ३३, व्यवसाय सोनार, रा. मु.पो. वाळंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग व एकांती वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे तसेच घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुशंघाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत सी. सी. टी. व्ही. फुटेजचे आधारे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने अजय काळे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते.
तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने साखळीद्वारे त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान चोरलेले सोने हे किरण बेद्रे यास विक्री केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयातील आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने शनिवार (ता १५) पर्यंत रिमांड पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, सचिन घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापफोर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर.
रामदास बाबर, निलेश शिंदे, चंद्रकांत जाधव, अमीनोत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, काशीनाथ राजापुरे मुकुंद कदम, प्रमोद नवाले, दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, निखील राव, श्रीमंत होनमाने यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास नितीन अतकने हे करीत आहेत.