थेऊर येथे विवाहीतेकडे शरीरसुखाची मागणी, पिकअप चालकावर गुन्हा दाखल..

लोणी काळभोर : कामावरुन घरी निघालेल्या विवाहितेस पिकअप चालकाने घरी सोडण्याच्या मोबदल्यात पैश्याऐवजी शरीरसुखाची मागणी करून छेडछाड केल्याप्रकरणी पिकअप चालकावर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सदर घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीत गाढवे वस्ती परिसरात शुक्रवार ( ता.८) रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी २६ वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नंदु जाधव (वय २५, रा.
जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली ) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विवाहिता व त्यांची जाऊ एकाच ठिकाणी नोकरी करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्या दोघी कामाला गेल्या होत्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर थेऊर फाटा येथे घरी जाण्यासाठी त्या वाहनाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी नंदु जाधव हा पिकअप घेऊन थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेने चालला होता.
या दोघींना पाहून त्याने टेम्पो थांबवला व त्यांना घराकडे सोडवितो गाडीत बसा असे म्हणाला. दोघी गाडीत बसल्यानंतर पिकअप थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुल ओलांडून गाढवे वस्तीजवळ आला. त्यावेळी जाधव यांने आंधाराचा फायदा घेवून विवाहितेच्या उजव्या मांडीला स्पर्श केला.
त्यानंतर दोघींनी गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला व “तुझे काय पैसे झाले असेल ते भाडे घे, परंतु आम्हास येथे उतरव.” असे म्हणाल्या. तेव्हा तो “काय होतंय एवढं, मला भाडे वगैरे देवू नका फक्त मला खुश करा” असे म्हणून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल. असे गैरवर्तन केले.
जाधव याने लगट करून विवाहितेची छेडछाड केली आहे. त्यामुळे विनयभंग झाला आहे. अशी तक्रार पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.