दुसऱ्या टप्प्यात १० हजार शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, दादा भुसे यांनी दिली माहिती..


पुणे : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात १८ ते १९ हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलमार्फत भरती केली आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या दुसर्‍या टप्प्यात १० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण विभागातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहे.

भुसे म्हणाले आहे की, शिक्षक भरतीसाठी संचमान्यता तसेच पटपडताळणी करण्यात येणार आहे. यामधून नेमक्या किती जागा रिक्त आहेत. त्याची निश्चिती करण्यात येईल. यामध्ये पाठीमागील भरतीमधील ज्या लोकांची भरती प्रलंबित आहे. त्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा येत्या २० जानेवारीला सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावलीविषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविाले आहे.

या वेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, माध्यमिकचे शिक्षण संचालक संपत गोसावी, प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!