उन्हाळ्यातही दिसा सिंपल आणि कूल ! फॅशन तज्ज्ञ देतात हलके कपडे घालण्याचा सल्ला !!
उरुळी कांचन : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतक माहला हलके आणि डोळ्यांना शांत वाटणारे कपडे घालण्यास प्राधान्य देतात. अशावेळेस पांढऱ्या रंगाचा वापर तुमची स्मार्ट दिसण्याची इच्छा अगदी सहज पूर्ण करू शकेल. तसंच हा रंग सर्वच वयोगटातील महिलांना चांगला दिसतो.
उन्हात काही रंग बघून डोळ्यांना त्रास होतो, तर काही रंग बघून डोळ्यांना शांत वाटतं. म्हणूनच सगळेच फॅशन तज्ज्ञ उन्हाळ्यात हलके कपडे घालण्याचा सल्ला देतात. अशावेळेस पांढर रंग हा एक उत्तम पर्याय आहे. अधिकांश कलाकार पांढऱ्या रंगाला प्राधान्य देत आहेत. शिवाय हा रंग सर्वच वयोगटातील महिलांना चांगला दिसतो. स्टाइल एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही कॅज्युअल, पार्टी किंवा ऑफिस वेअरमध्ये वापरू शकता. शिवाय पांढरा रंग अनेक रंगाबरोबर छान दिसतो. पांढऱ्या चिकनच्या कुर्त्याबरोबर फ्लोरल प्रिंटचा स्कार्फ आणि एक ज्यूटची बॅग तुमचं स्टाइल स्टेटमेंट ठरू शकतं.
कलरफुल दिसायचं असेल तेव्हा
जर तुमचा मूड प्रयोग करण्याचा असेल
तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसबरोबर काहीतरी रंगीबेरंगी ट्राय करू शकता. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसबरोबर रंगीबेरंगी बांगड्या, रंगीत बॅग खूप सुंद दिसते. रंगीबेरंगी ओढणीसुद्धा मस्त दिसते.
पांढऱ्या रंगाचा मस्त पर्याय
जर तुम्हाला कोणताही कॅज्युअल ड्रेस घालायचा असेल तर पांढऱ्या रंगाचा पर्याय तुमच्याकडे आहे. प्रिटेंड किंवा लेस पॅटर्नमधील ड्रेस तुम्ही घेऊ शकता. याशिवाय स्ट्रैपलेस, वन शोल्डर असे प्रकारही तुम्हाला आवडत असलीत तर घेऊ शकता. जर तुम्हाला फॅन्सी दिसायचं असेल तर तुम्ही ड्रॉप वेस्ट किंवा बॅकलेस ड्रेसचा विचारही करू शकता. या ड्रेसेसमध्ये पांढरा रंग अधिक शोभून दिसतो. जर तुम्हाला मिनी, मिडी, स्कर्ट घालायला आवडत असेल तर यामध्येही पांढरा रंग तुम्हाला वेगळा व आकर्षक लूक देईल. सध्या स्टोलची पण खूप फॅशन आहे. अशावेळेस कोणत्याही टॉप किंवा कुर्त्याबरोबर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या स्टोलचा वापर करू शकता. याव्यतिरीक्त कट वर्कचे, रॅप अराऊंड स्कर्ट, प्रॉम्प ड्रेसेसही तुम्ही घालू शकता.
कॉलेज असो वा पार्टी पांढरा रंग तुम्हाला रॉकिंग लुक देतो. जर एखाद्या खास पार्टीत तुम्ही पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करू इच्छिता तर त्याबरोबर सोनेरी रंगाचं कॉम्बिनेशन ट्राय करा. छान दिसेल. पारंपरिक पेहरावाचा विचार करत असाल तर चिकन किंवा बनारसी साडी शोभून दिसेल. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कॉटन, लिनन, सिल्क, कॉटन नेट यांसारख्या फॅब्रिकची निवड करू शकता. उन्हाळ्यासाठी कॉटन हे फॅब्रिक उत्तम. पार्टी ड्रेससाठी पांढरं व चंदेरी अशा रंगसंगतीचाही विचार करू शकता.
एकदम सिंपल लूकसाठी
जर तुम्ही ऑफिससाठी किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमासाठी साधं रहाणं पसंत करत असाल तर लिननच्या पांढऱ्या शर्टबरोबर काळ्या रंगाच ट्राऊझर घालू शकता. ही रंगसंगती तुम्हाला ग्रे ल लुक देईल. जर तुमच्या ऑफिसमध्ये केप्री घालायची परवानगी असेल तर पांढऱ्या केप्रीबरोबर कोणत्याही रंगाचा टॉप घालू शकता. याशिवाय चिकनचा पांढरा कुर्ताही छान दिसतो. पांढऱ्या पटियालाबरोबर फ्लोरल प्रिंटचा कुर्ता एक फ्रेश लुक देतो. जर तुम्ही विवाहीत महिला असाल तर पांढऱ्या रंगाची कॉटनची साडीही वापरायला हरकत नाही.