पुण्यात सेक्सटाॅर्शनचे जाळे! संगणक अभियंता अडकला जाळ्यात, १० लाखांची फसवणूक…

पुणे : संगणक अभियंता असलेल्या तरुणाला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून त्याला ७ लाख १४ हजार रुपये भरायला लावून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आंबेगाव येथील एका ३३ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणाला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहात असल्याचे स्क्रीन शॉट या महिलेने काढले. हे स्क्रीन शॉट व व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविण्याची तिने धमकी दिली.
त्यानंतर दिल्ली सायबर कमिशन श्रीवास्तव बोलत आहे. पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून तिने फिर्यादीकडून वेळोवेळी ७ लाख १४ हजार ४२४ रुपये उकळले. शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक पुराणिक तपास करीत आहेत.
Views:
[jp_post_view]