धक्कादायक ! पुण्यात चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून, पैशांचीही केली होती मागणी…!


पुणे : पुण्यात सध्या एक खळबळजनक घटना घडली आहे. माहेरच्या माणसांकडून किराणा दुकान आणि आलिशान चारचाकी वाहनासाठी पैसे आण, असे म्हणून महिलेचा सासरच्यांनी छळ करून ओढणीने गळा आवळून पतीने तिचा खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जाधववाडी चिखली येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली. यामुळे पोलीस तपास करत आहेत. श्वेता आणि प्रवीण यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे. प्रवीण जाधव याचे जाधववाडी येथे किराणा दुकान आहे.

या दुकानासाठी तसेच चारचाकी वाहनासाठी श्वेता हिने माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी करून आरोपींने तिचा छळ केला. तिला अनेकदा यासाठी त्रास दिला गेला ,तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.

यानंतर पती प्रवीण याने श्वेता हिचा ओढणीने गळा आवळला. यात श्वेता हिचा मृत्यू झाला. मात्र, तिला चक्कर आल्याचे सांगत तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.

यामुळे आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. श्वेता हिचा पती प्रवीण काळूराम जाधव, सासरा काळूराम विठ्ठल जाधव, सासू प्रमिला काळूराम जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!