पिंपरी चिंचवडमध्ये पसंती वाहन क्रमांकासाठी नागरिकांनी मोजले तब्बल ‘एवढे’ कोटी

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आपल्या गाड्यांसाठी चॉइस नंबर घेण्यासाठी लोक लाखो रुपये मोजत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांत व्हीआयपी अर्थात पसंती क्रमाकांसाठी नागरिकांनी तब्बल 20 कोटी 37 लाख रूपये मोजले आहेत.
हा आकडा खूपच मोठा आहे. याठिकाणी वाहनधारकांना त्यांच्या पसंतीनुसार क्रमांक चॉईस करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यासाठी ज्यादाचे शुल्क आकारण्यात येते. पूर्वी लोकप्रतिनिधींच्या वाहनांना आकर्षक क्रमांक दिसून येत होते.
असे असताना आता परिस्थिती बदलली आहे. सामान्य वाहनचालकांच्या वाहनांना देखील आकर्षक क्रमांक घेण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. वाहनांच्या किमती वाढत असताना चॉइस नंबरसाठी पिंपरी-चिंचवडचे नागरिक आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यामध्ये दुचाकीसाठी 0009 हा क्रमांक हवा असल्यास 1 लाख रुपये आणि चारचाकीसाठी 5 लाख दर आकारण्यात येत आहे. परंतु, नागरिक आवडीचा नंबरसाठी लाखो रूपये खर्च करण्यात मागेपुढे पहात नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे याठिकाणी सरकारला मिळत आहेत.