पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करुन मित्राचा खून, गुप्तांग कापून मृतदेह विहिरीत फेकला, घटनेने उडाली खळबळ..


पुणे : पिंपरी – चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मद्यपान करत असताना मित्राने शिवीगाळ केल्याने त्याचा ब्लेडने सपासप वार करुन खून केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून एका विहिरीत फेकून दिल्याची धक्कदायक ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्ल्या मसु गायकवाड (वय.२० रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे (वय.१८ रा. बौद्धनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि मयत गणेश हे तिघेजण मित्र होते. बुधवारी मध्यरात्री चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मैदानात तिघे दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि याच वादातून गणेशने अभिषेकला शिवीगाळ केली.

शिवीगाळ केल्याच्या रागातून मद्यधुंद असलेल्या अभिषेक आणि अल्पवयीन मुलाने गणेशवर ब्लेडने आणि धारदार शस्त्राने वार करुन खून केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापले. पुरवा नष्ट करण्यासाठी आरोपींनी गणेशचे कपडे काढून त्याला दगड बांधून विहीरीमध्ये फेकून दिले.

आरोपी अभिषेक आणि अल्पवयीन मुलगा हे सोसायटीमध्ये घरफोडी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा तपास करत असताना आरोपींनी त्यांच्या मित्राचा शनिवारी खून केल्याचे उघड झाले. दरम्यान बेपत्ता झालेल्या गणेशचा शोध त्याचे नातेवाईक घेत होते.

चिंचवड येथील रेल्वे स्थानकाजवळ विहिरीत गणेशचा मृतदेह आढळला. गणेशच्या कुटुंबाने देखील आरोपींवर आरोप केला होता. आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!