कुंजीरवाडीत खूनाचा कट घडवून आणण्यासाठी कोयते काढून दहशत; लोणीकाळभोर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या…!

उरुळी कांचन : कुंजीरवाडी येथे कोयते काढुन दहशत व खुनाचा कट करणाऱ्या सराईतांना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलिसांच्यामुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला असून त्यामुळे एकाचा जीव वाचला आहे.
तानाजी भाऊसाहेब गावडे (वय २४ वर्षे, कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे), गणेश साहेबराव महाळनर, (वय २० वर्षे, धंदा मजुरी, मुळ रा. शेलकुड, ता. अहमदपुर, जि.लातुर सध्या रा. माऊली सांवत यांचेकडे भाडोत्री, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) , महेश विजय महारनवर, वय २१ वर्षे धंदा ड्रायव्हर, सध्या रा. पिराचे मंदिराजवळ, म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. तरडगांव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता.२१) रोजी कुंजीरवाडी येथे काही इसम कोयते काढुन दहशत करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
पोलीस घटनास्थळी पोहचले असता, सदर ठिकाणी काही इसम आरडा ओरडा करत होते, त्यातील दोन इसम त्यांचे हातातील कोयते हवेत फिरवुन आज गणेश चौधरी याला संपवुन टाकतो. असे म्हणुन जोरजोरात ओरडत होते.
त्यावेळी सदरचे इसम पोलीसांना पाहुन पळुन जाऊ लागले .त्यावेळी पोलीस स्टाफने शिताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेवुन त्यांचेकडुन दोन धरधार लोखंडी कोयते जप्त केले. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड सुनावली असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक विष्णु देशमुख करत आहेत.
खूनाचा कट उधळून लावण्याची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, हनुमंत तरटे, विष्णु देशमुख, पोलीस अंमलदार बनकर, सुतार, पाटील, कुदळे, शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.