पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात भीषण चक्रीवादळाचा तडाखा; पाच ठार तर शेकडो जखमी


जलपाईगुडी : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरे पडली, झाले उन्मळून गेली, विजेचे खांब पडले. या वादळामुळे आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळात १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल घटनास्थळाचा आढावा घेतला. त्याचबरोबर जखमींची देखील भेट घेतली आहे. या परिस्थितीत प्रशासन सर्व प्रकरची मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे.

द्विजेंद्र सरकार (५२), अनिमा रॉय (४९), जोगेन रॉय (७०) आणि समर रॉय (६४) असे या वादळामध्ये मृत्यू झाल्याचे नवे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आपत्तीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे, पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पीडितांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्रशासन गरजू लोकांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!