उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत हद्दीत कल्याण मटका आढळला; पोलिसांची कारवाई! एकावर गुन्हा दाखल


उरुळी कांचन : कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळवत असताना आढळलास अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत हद्दीतुन समोर आला आहे. शनिवारी (ता. २३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडून रोख रक्कमेसह मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

प्रकाश कचरू पवार (वय २८, रा. जय मल्हार रोड, जाधववस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली, मुळ रा. सर्व्हे नं. २५९, महात्मा गांधी वसाहत, पांढरे मळा, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल संजय खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जयमल्हार रोडच्या कडेला पिंपळाच्या झाडाखाली प्रकाश पवार हा ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळवत असताना आढळला.

या कारवाईत रोख रक्कम, एक पांढऱ्या रंगाचे आकडेमोड केलेले पुस्तक, मोबाईल, एक कार्बन, असा १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!