मित्रांचे प्रयत्न ठरले व्यर्थ! भीमाशंकरमध्ये डोंगरात राणभाजी शोधायला गेला पायाला ठेच लागली अन्..
भीमाशंकर : सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. काही तरुण या दिवसात अनेक ठिकाणी पर्यटनाला जातात. या दिवसात अनेकदा माळरानावर रानभाज्या सुध्दा येतात.
काल पुण्याच्या भीमाशंकरच्या जंगलात रानभाज्या काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा कड्यावरून पडून मृत्यु झाला आहे. यामुळे खळबळ उडाली.
अजय शशिकांत कराळे वय 23 असे या तरुणाचे नाव आहे. ज्यावेळी त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती त्या परिसरात समजली, त्यावेळी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत दोन मित्र देखील होते. त्यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. अजय कराळे, अक्षय कराळे व संतोष चपटे असे तीन मित्र काल त्याच्या गावाला लागून असलेल्या डोंगरावरती गेले होते.
मागच्या काही दिवसांपासून डोंगरामध्ये चाव्याचे कोंब व कोळूची भाजी डोंगरात दिसू लागली आहे.
अधिक पाऊस झाल्यामुळे डोंगरवाटा निसरड्या झाल्या आहेत. तिथल्या एका निसरड्या जागी अजयला ठेच लागली आणि तो दरीत पडला.
यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला होता, त्याचबरोबर त्याचा हात फॅक्चर झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अजयच्या डोक्याला अधिक मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.