अमरावतीत भाजप विजयासाठी हिंदू -मुस्लिम दंगली घडवू शकते ! आमदार बच्चू कडूंचे खळबळजनक वक्तव्य !!
Amravati : “मला अजूनही भिती आहे की, 26 तारखेला किंवा उद्या-परवा अमरावतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल घडेल. त्यांची खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची सवय असल्याने आम्ही दोन पावलं मागे घेतली. नाहीतर रात्रीच या ठिकाणी आमचे 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. असे खळबळजनक वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना पराभव दिसत आहे. 23 आणि 24 ला आम्हाला मैदान मिळाले होते. 23 तारखेलाच परवानगी मिळाली होती. पण आम्हाला 23 तारखेला दुपारी सांगितले की तुम्हाला परवानगी नाही आणि आमचा प्रचार थांबवण्यात आला. निवडणूक असल्याने म्हणून थांबलो, नाहीतर आमचा स्वभाव थांबण्याचा नाही,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
Views:
[jp_post_view]