इम्रान खानच्या समर्थकांच्या गदारोळामुळे गोळ्या घालण्याचे आदेश, पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर…!


नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सध्या वातावरण तापले आहे. देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्याला पाक रेंजर्सनी अटक केल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे. याबाबत लष्करप्रमुख मुनीर यांनी तातडीची बैठक बोलावली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर तातडीची बैठक बोलावली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था लष्कर सांभाळू शकते, तसेच लष्करी जागेवर हल्ले करणार्‍यांना गोळ्या घालण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. यामुळे परिस्थिती नाजूक बनली आहे. दरम्यान, इम्रान खानच्या समर्थकांच्या गदारोळामुळे बदमाशांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून देशभरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सिंध वगळता पाकिस्तानातील पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान या तीन प्रांतात इंटरनेट बंद करण्यात आले.
सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!