महत्वाची बातमी! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, जाणून घ्या….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अजून देखील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. सध्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित झाले असून त्याची तीव्रता कमी झाली आहे.
यामध्ये आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, बीड, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या प्रणालीमुळे राज्यभर ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. हवामान खात्याने कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण कायम असून तापमानात थोडी घट झाली आहे. परतीच्या मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामानातील बदल स्पष्ट दिसत आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. सध्या शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे.