पुण्यातील केसनंद ग्रामपंचायतीत दफनभूमीसाठी दिलेल्या जागेवर बेकायदेशीर मज्जिद, ग्रामपंचायतीकडून परवानगी न घेता बांधकाम….

हवेली : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायत येथील ५ गुंठे जागा काही वर्षांपूर्वी बाबू रामोशी यांनी बक्षीस पत्र करून मुस्लीम समाजाच्या दफनभूमी साठी दिली होती. ती जागा फक्त दफन भूमीसाठी दिली असता त्याठिकाणी आता अनधिकृतपणे मस्जिद उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
या मज्जिदीच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. या बेकायदेशीर बांधकामाबद्दल केसनंद ग्रामपंचायत मध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही. यामुळे आता या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.
या ग्रामपंचायतीने यांना न हरकत प्रमाणपत्र हे दिले नाही. अवैध मज्जिद बांधकामांवर सरकार सध्या बारिक लक्ष ठेवून आहे. महायुती सरकारच्या काळात अवैध मज्जीद बांधकाम कुठेही बांधून देणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. मात्र आता या कामामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत केसनंद येथील कुशल सातव यांनी माहिती दिली आहे. सातव यांनी सांगितलं की ही जागा काही वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी कब्रस्तानासाठी दिलेली होती. पण काही वर्षानंतर या जागेवरती बेकायदेशीर रित्या मज्जित बांधण्यात आलेली आहे. यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.
हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित काढण्यात यावी अशी संबंधित विभागाकडे केलेली आहे. या मज्जीद मुळे भविष्यात दफनभूमीला जागा अपुरी पडणार आहे. येथे आता नमाज पठण करण्यास देखील सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.