तू भंडारा लाव नाही तर…मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे समर्थकांना दिला थेट इशारा…वाद पेटणार?


बीड : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी गेल्या आठवड्यात जरांगे पाटील यांना धमकी दिली होती. आम्ही भाळी भंडारा लावल्याचे थेट इशारा त्यांनी दिला होता. आता वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फड यांना थेट उत्तर दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मुंडेंसह फड यांच्यावर निशाणा साधला. मी माझ्या समाजाला देव मायबाप मानलं आहे. माझी संपत्ती तुम्ही आहे मी आयुष्यात एक रुपया कमविला नाही, माझे मायबाप तुम्ही आहात.मी पण डावावर लागलो.

माझे कुटुंब पण डावावर लागलंय. कधी मारून टाकतील मला आणि माझ्या कुटूंबाला तरी मी हटत नाही. मी रात्रंदिवस बाहेर आहे. कोणाला यायचे त्याला येऊ द्या आम्ही समर्थ आहे लढायला मराठे तू कोणत्याही गावात ये राज्यातल्या प्रत्येक गावात माझा मराठा आहे.

फक्त तू ये. धमक्या देऊ नको. यावं करणार आहे त्याव करणार, या धमक्या नको देऊ. काल कुणीतरी म्हणालं, ते धनंजय मुंडे याचं कुणीतरी ते म्हणाले भंडारा लावून मारून टाकतो. तू भंडारा लाव नाहीतर गुलाल काहीही लाव. मी मरायला भीत नाही.

माझी कधीपण तयारी आहे. माझा समाज पण सज्ज आहे, असा इशारा त्यांनी फड यांना दिला. का मारायचं तर गरिबांच काम करतो हेच कारण ना. समाजाने एकजुटीने रहा खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्या क्षेत्रात अडचणी आहेत त्या क्षेत्रात सुध्दा मी एक यंत्रणा उभा करायला लागलोय. मी समाजाला सांगितलेले आहे चार पाच दिवसानंतर राज्यभरातील एक वर्षासाठी दौरे पूर्णपणे बंद करणार आहे. तुम्हाला आरक्षण दिलंय चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टेंशन नाही, तुम्हाला आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करतोय. महाराष्ट्रातील कोणत्याही कोनाकोपर्‍यात अडचण आली तर १५ मिनिटात माणूस तुमच्या मदतीला आला पाहिजे.

मी एकदा मुद्दा घेतला की आपण एकदा माग लागलो की पाणी काढूस्तोवर माग सरकत नाही मग जे व्हायचं असतो असू दे. शेतकरी म्हणून आंदोलनात उतरा. शेतकर्‍यांनी सुध्दा पुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये गटतट नसले पाहिजेत, तरच त्यांना न्याय मिळेल. तुमचं कर्ज ठेवत नाही. या पवित्र व्यासपीठावरुन आजच शब्द देतो, तुमचं कर्ज ठेवत नाही, तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो तुमच्या पीक विम्याचे पैसे कसे काय मिळत नाही ते बघतो, तुमच्या दुधाला कसा भाव मिळत नाही ते पण आपल्याकडे लागलं तुम्ही फक्त टेंशन नाही घ्यायचे.

फक्त चल म्हणलं की एकदा बस म्हणलं की उठायचं नाही. लढाई जिंकायची म्हटलं तर ती चिकाटीने लढायची असते. आपण चिकाटीने लढलो म्हणून 58 लाख नोंदी निघाल्या अडीच ते तीन कोटी मराठे आरक्षणात गेलेत तुम्हाला काय बोंबलायचे ते बोंबलू द्या. कुणी उठत आणि माझ्या मागे लागतात दोन चार दिवसाला चार पाच जण उठले की आले मीडियात आणि तेवढाच आरोप आहे दुसरं काही नाही असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!