पतीचा विकृत कारनामा! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले, ब्लॅकमेल करत डान्सबारमध्ये नाचवले अन्… नाशिक येथील घटनेने खळबळ

नाशिक : नाशिकच्या हिरावाडी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. पतीने पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळही केली.

त्यानंतर त्याने कहर केला. तिला जबरदस्तीने डान्सबार मध्ये नाचण्यास भाग पाडले. पीडितीच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पती पवन राजेंद्र वाडेकर, त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, ऑगस्ट २०२२ते २१ जुलै २०२५ या कालावधीत तिचा पती पवन राजेंद्र वाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे यांनी संगनमताने गुंगीकारक औषध देऊन तिला मानसिक व शारीरिक पद्धतीने गुलाम बनविले.

या काळात तिला बेंगळूर व सोलापूर येथे नेले. तिचे अश्लील व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करून जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले.
त्यानंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली आणि डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले. छळ असह्य झाल्याने तिने पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.