लव्ह मॅरेजनंतर झाला घोळ! नवरा गर्लफ्रेंडसोबत पळून गेला, मग पत्नी दिरासोबत पळून गेली, जाऊबाई थेट कोमातच गेली, नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेश : नवरा गर्लफ्रेंडसोबत पळून गेला, मग पत्नी दिरासोबत पळून गेली, जाऊबाई थेट कोमातच गेल्याची घटना उघडकी आली आहे. उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातील महूआडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील ही घटना आहे.
महुआडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेत गावातल्या एका तरुणानं त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं होतं. लग्नाला काही दिवस झाले आणि त्याला दुसरीच एक गर्लफ्रेंड आवडू लागली तिच्यावर त्याचे प्रेम जडले आणि दोघेजण पळून गेले.
या घटनेने गावात खळबळ उडाली मात्र तरी देखील त्याने जिच्याशी प्रेम विवाह केला होता ती पत्नी मात्र त्या कुटुंबातच राहिली काही दिवसांनी तिचे आणि दिराचे अफेअर जुळले.त्यावरून घरात कुरबुरी होऊ लागल्या. त्यातच एके दिवशी नवऱ्याला जावेसोबत एकत्र पकडल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला.
हा वाद एवढा टोकाला गेला की, पोलिसात तक्रार केली. त्यानंतर कुटुंबासमोर हे प्रकरण उघडे झाले. काही दिवस शांतता झाली, मात्र प्रेम प्रकरण सुरूच राहिल्याने अखेर एके दिवशी महिलेचा पती पळून गेलेल्या भावाच्या पत्नीला घेऊन घरातून पळून गेला. मग रागारागाने दिराच्या पत्नीनेही माहेर गाठले.
त्यानंतर माहेरच्या लोकांनी महुआडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. त्यावरून पोलिसांनी तपास केला आणि संबंधित महिलेचा पती आणि तिची जाऊबाई हे दोघेही गावात परतले.
सहा डिसेंबर रोजी ते घरी आले. त्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली आणि तिने माहेरच्या लोकांसमवेत सासर गाठले. या ठिकाणी नवरा आणि जावेला माहेरच्या नातेवाईकांनी मारहाण देखील केली. मग दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले या प्रकरणात दीर आणि जाऊ या दोघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.