Human Washing Machine : आता फक्त कपडे नव्हे तर माणसांनाही मशीनमध्ये धुता येणार? ‘या’ कपंनीने तयार केली माणसांना धुणारी मशीन…

Human Washing Machine : आपल्या शरीराच्या स्वच्छतेसह अनेक कारणांसाठी अंघोळ अत्यंत महत्त्वाची असते. पण अनेकांना अंघोळ करण्याचा खूप कंटाळा येतो. पण आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. जपानी इंजिनिअरने त्यावरही तोडगा शोधला आहे.

आतापर्यंत तुम्ही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरली जात असल्याचे ऐकले असेल पणा आता माणसांना धुणारी मशीनही देखील बाजारात येणार आहे. आता खरंच स्वतः आंघोळ करायची गरजच नाही, माणसाच्या आंघोळीची देखील वॉशिंग मशीन आता येत्या काही कालावधीत बाजारात दिसली, तर नवल वाटायला नको.
हो हे खर आहे.. अर्थातच जपानी टेक्नॉलॉजी याबाबतीतही अग्रेसर असून जपानच्या कंपनीने अशी एक शरीर धुणारी वॉशिंग मशीन तयार केली आहे की ज्यामध्ये पंधरा मिनिटात तुमचं अंग धुवून कोरडे होणार आहे.

एका कंपनीची वॉशिंग मशीन आली की अनेक कंपन्या बाजारात येतीलच परंतु आता ही पहिली संकल्पना जपान मधील सायन्स कंपनीने विकसित केली असून नुकत्याच झालेल्या ओसाका प्रदर्शनामध्ये मिराई निंगेन सेंटकुकी नावाची ही मशीन या कंपनीने सादर केली. आणि अर्थातच साऱ्यांचीच बोटं तोंडात गेली. Human Washing Machine
एखाद्या फायटर विमानाच्या कॉकपिट सारखं हे मशीन असून त्यामध्ये बसलं की अगोदर संपूर्ण मशीन शरीराची स्कॅनिंग करते. आणि वॉशिंग मशीन प्रमाणेच सुरुवातीला शरीर धुवून नंतर ते कोरडे करते. पाणी एखाद्या सूक्ष्म थेंबासारखे किंवा बुडबुड्यासारखे माणसाच्या शरीरावरील शरीर स्वच्छ केले जाते.
दरम्यान, त्याचबरोबर एखाद्या स्पा मध्ये बसल्यासारखा या मशीनमध्ये अनुभव मिळू शकतो. संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले हे मशीन शरीराला कुठेही इजा होणार नाही अशा स्वरूपांनी काळजी घेते. येणाऱ्या काळामध्ये १००० लोकांवर याची चाचणी झाल्यानंतर ते बाजारात येणार आहे.