महिलांनो तुमचे किचन कसे ठेवाल स्मार्ट !


उरुळीकांचन : शहरात घरांसाठी जागा लहान होत चालल्या आहेत, विशेषतः किचनच्या बाबतीत जागेची केलेली तडजोड अनेक महिलांना अजिबात पटत नाही. तेंव्हा लहान जागेतही किचन स्मार्ट कसे ठेवाल, त्याच्या काही टिप्स.

आज बाजारात मॉड्यूलर किचन उपलब्ध आहेत. यामुळे किचनमधील प्रत्येक वस्तू नीट आणि आकर्षक पद्धतीने मांडता येते. प्रत्येक वस्तूसाठी जागा होईल अशा पद्धतीनेच ते बनवलेले असते, त्यामुळे उगाच पसारा होत नाही आणि किचन सुटसुटीत दिसते.

वस्तू जिथल्या तिथे ठेवल्याने किचनमध्ये काम करतांना श्रम आणि वेळ यांची बचत होते. किचनचा रंग हा आल्हाददायक असावा. स्वच्छ आणि नीटनेटक्या किचनमुळे काम करायला देखील उत्साह वाटतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन कायम सुंदरच दिसायला पाहिजे अशी काही जागा नाही. तेंव्हा नुसतच सुंदर दिसण्यापेक्षा किचनची जागा तिचा कोपरा न कोपरा उपयुक्त कसा ठरेल यावर लक्ष दिले पाहिजे. दर एक महिन्याने संपूर्ण किचन छतापासून टाईल्सपर्यंत स्वच्छ केले पाहिजे. यामुळे अनावश्यक गोष्टी देखील काढून टाकता येतात, उगाचच ट्रॉली आहेत म्हणून मागे ढकललेला पसारा सुद्धा बाहेर निघतो.

बेसिनची नळी स्वच्छ करणे, लाईट फिटिंग आणि किचनमधील इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की फ्रीज, मायक्रोवेव्ह, मिक्सर इत्यादी चेक केलं पाहिजे.

आता आणखी काही महत्वाच्या टिप्स : असे हटतील हट्टी डाग

कपड्यांवर पडलेले हट्टी डाग हटवण्यासाठी खालील काही पद्धती खूपच उपयोगी पडतात.

– चहा, कॉफी, चॉकलेटचे, कोकोचे डाग या पदार्थांचे डाग वाळल्यानंतर खूपच पक्के होतात. यासाठी यांचे डाग एखाद्या कपड्यावर पडताच त्यावर त्वरित थोडीशी टाल्कम पावडर टाकावी. धुताना डागाच्या जागेवर गरम पाणी ओतून चोळून धुवावे. या उपायांनीही डाग गेले नाहीतर हायड्रोजन पॅरॉक्साइडच्या पाण्याने डाग घालवावेत.
– आइस्क्रिमचे डाग : आइस्क्रिमचा डाग पडला तर त्यावर अमोनियाचे मिश्रण टाकावे व पंधरा मिनिटांनंतर धुवावे. डाग नाहीसे होतील.
– पानाचे डाग : कपड्यांवर पानाचा डाग पडला तर कच्च्या दुधात भिजत ठेवावा. अर्ध्या तासानंतर धुवावा. डाग साफ होईल.
– रक्ताचा डाग : रक्ताचा डाग कपड्यांवर पडला तर लवकरात लवकर कपडा पाण्याने धुवावा. जर डाग जुनाट असेल तर त्यावर स्टार्चची पेस्ट लावावी. थोडा वाळू द्या. नंतर भिजवून ब्रश लावावा. डाग निघून जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!