लाडकी बहीण योजनेत e-KYC कशी करायची?, जाणून घ्या संपूर्ण माहिती..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांच नावे या योजनेतून हटवण्यात आलेली आहेत.

तसेच काही महिलांनी गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आलेले आहे. असे असतानाच आता या योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळावेत, यासाठी राज्य सरकारने आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केलेले आहे. ही ई-केवायसी नेमकी कशी करायची? याबाबतची सर्व प्रक्रिया आता महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी आता ई-केवायसी करायची आहे, असे फर्मान आल्यानंतर आता काही लाडक्या बहि‍णींमध्ये गोंधळाची स्थिती आहे. ही ई-केवायसी नेमकी कशी करायची, त्यासाठी कुठे जायचे यासारखे प्रश्न महिलांना पडलेले आहेत.

मात्र महिलांची हीच गैरसोय पाहता आता आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स खात्यावर ई-केवायसीची सर्व प्रक्रिया सांगितली आहे. त्यांनी ही प्रक्रिया कशी करता येईल हे सविस्तर सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात अगोदर e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

त्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send

OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

नंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील:

माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!