गिरीश महाराज मोरे यांच्यावर नेमकं किती कर्ज होतं? आत्महत्या करण्याआधी 4 चिठ्ठया लिहिल्या, आता चिठ्ठीत भयंकर माहिती समोर आली…


पुणे : देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी काल आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यावर 30 ते 40 लाख कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.

शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र त्यातून जास्त पैसे मिळत नव्हते.

चिठ्ठीत ते म्हणाले, खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्यांना मदत मागणं चुकीचं पण कृपया करून आई-वडिलांना सांभाळा. दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय त्याची सगळी यादी देतोय.

गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करून आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा आणि आम्हाची नवऱ्याबाई तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियंका तिला वेळेत देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो, असं म्हटलं आहे.

त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!