पुण्यात अपघाताचा थरार ; कारखाली चिरडून वृद्धाचा करुण अंत….

पुणे : पुण्यातील नागरिकांना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. याच खड्ड्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. खड्ड्यात अडकून दुचाकी पडल्यानंतर वृद्धाला मागून येणाऱ्या कारने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ काशिनाथ काळे असं 61 वर्षीय मयत ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यातुन जाताना त्यांची गाडी घसरली आणि त्यांचा तोल जाऊन ते कोसळले.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेवढ्यात मागून एक गाडी आली आणि त्या कारच्या चाकाच्या खाली ते चिरडले.त्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावे लागले.
दरम्यान पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचते व नागरिकांना त्याची खोली कळत नाही. परिणामी, अनेक अपघात होऊन जखमी होतात. या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ‘आप’ने करत गणेशपेठ मुख्य बसस्थानक चौकात गुरुवारी ‘खड्ड्यात समाधी’ आंदोलन केले.
