पुण्यात भीषण घटना! गॅस सिलेंडरचा स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू, परिसरात खळबळ..


पुणे : पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोकुळनगर भागातील पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा भाजून मृत्यू झाला आहे.

वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळ नगर येथे पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागली होती भीषण आग. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग विझवण्यात आली. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडर केळीच्या सालासारख सोलून वेगळा झाला होता. सिलेंडरचे सर्व भाग वेगवेगळे झाले होते.

या भीषण स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे मोहन चव्हाण (वय २०-२२) आणि आतिश चव्हाण (वय ५०-५५) अशी आहेत. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, स्फोटामुळे घरातील सगळी वस्तू आसपास विखुरली गेली आणि शेजारील पत्र्याची शेडदेखील जळून खाक झाली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी सांगितलं की स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. काही सेकंदात आग भडकली आणि आगीत घर पूर्णपणे भस्मसात झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!