पुण्यात भयंकर घटना! नराधमाने 35 वर्षीय गतिमंद महिलेला गाठलं, पकडून घरात नेलं अन्….


पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील पर्वती परिसरात एका ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेची हतबलता पाहून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पर्वती पायथा परिसरात घडली. आरोपी धीरज लोंढे (वय ३५) याने पीडित महिला गतिमंद असल्याचे ओळखून तिला गाठले. तिला धमकावून तिच्याच घरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. कृत्य केल्यानंतर याबद्दल कोणाला काही सांगितल्यास ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तो पसार झाला.

पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या वहिनीला सांगितल्यानंतर हे भयानक वास्तव समोर आले. वहिनीने तातडीने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

पर्वती पोलिसांनी आरोपी धीरज लोंढे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. सुसंस्कृत पुण्यातील अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!