दौंड यवत परिसरात भीषण अपघात! दोन कारची धडक; दोघांचा मृत्यू, पाच जखमी..

दौंड : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. काल (बुधवारी, ता. २० रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

ज्ञानेश्वर थोरबोले (वय ५०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) व गणेश दोरगे (वय. २८ , रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या अपघातातील आरोपीवर कलमांतर्गत BNS ९०६(९). २८१. ९२५(अ). ९२७ (ब). ३२४ (४) (७) मो.वा. कायदा कलम १८४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश भोसले हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली.
या धडकेत ज्ञानेश्वर थोरबोले गणेश दोरगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर या भीषण अपघातात पाच व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदतकार्य सुरू केले.
लाल रंगाच्या स्विफ्टचा कारचालक पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली. या अपघातातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.