गृहमंत्री अमित शहा रायगडावर येताच खासदार संजय राऊत कडाडले, म्हणाले, महाराज वरून पाहतात, त्यांचा आत्मा…

मुंबई : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रायगडावरून जाऊन ते महाराजांना अभिवादन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्यानंतर अमित शहा हे रायगडला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी जाणार आहेत. यामुळे सुरक्षा व्यवस्था जोरदार तैनात करण्यात आली आहे.
असे असताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत. महाराज वरून पाहतात, त्यांची आत्मा महाराष्ट्राच्या कणाकणात आहे. या लोकांचा महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे शिवाजी महाराजांचे स्वराज्य असून ते तुम्ही हे स्वराज्य संपवायला आणि विकायला पाहत आहात.
जर या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक आणि रायगड या प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नाही. म्हणे मी सांभाळीन, तुम्ही काय काय पाहणार आहात. तुम्ही पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवू शकत नाही तुम्ही काय राज्य चालवणार आहात, अमित शहा गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे.
ते काय पंडित नेहरूंप्रमाणे जसे ते प्रतापगडावर मोटारीने पुढे गेले आणि चालत गेले. तसे तर येत नाहीत ते, महायुतीचा जेवणाचा जंगी कार्यक्रम आहे. असेही ते म्हणाले. यामुळे यावर अजून भाजपकडून कोणते उत्तर आले नाही. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल्याने ते रायगडावर जाणार आहेत.
आज याठिकाणी रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अमित शहा याबाबत निर्णय घेणार का हे लवकरच समजेल. याबाबत अनेकांनी इच्छा व्यक्त केली असून यामुळे महायुतीमध्ये धुसपूस सुरु आहे. अमित शहा यांच्याकडे सध्या शिंदे गट आग्रही मागणी करणार आहे.