महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त उद्या राजस्थानमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर…!

जयपूर : प्रसिद्ध समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सार्वजनिक सुटीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत केवळ फुले जयंतीला ऐच्छिक सुटी दिली जात होती.
गेहलोत सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटले की, ‘महिला आणि बाल विकास मंत्री ममता भूपेश, राष्ट्रीय फुले ब्रिगेड यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणारी पत्रं लिहिली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
समाजसुधारक ज्योतिबा फुले यांनी देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आणि समाज मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजाला दुष्कृत्यांपासून मुक्त करण्याचे, मुली आणि दलितांना शिक्षणाशी जोडण्याचे काम त्यांनी केले असून शेतकरी, मजुरांच्या हक्कासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत