पुण्यात पुन्हा एकदा होर्डिंग कोसळली, चार जण होर्डिंगखाली अडकल्याने उडाली खळबळ..


पिंपरी चिंचवड : याठिकाणी संध्याकाळी पुन्हा मोठी होर्डिंग कोसळली आहे. यामुळे पुन्हा एकदा
होर्डिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, या होर्डिंगखाली दबून चार जण गंभीर जखमी झाले असून चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल रात्री पुण्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हिंजवडी परिसरातील मान भागात एक मोठी लोखंडी होर्डिंग भर रस्त्यावर कोसळली आहे. या होर्डिंग खाली दबून दोन तरुण जखमी झाले आहेत. तसेच काही तीन-चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पुणे महापालिका शहरात 1500 अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत. हे काढून टाकण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील किवळेतील होर्डिंग्ज कोसळल्यानं पाच जणांचा झाला होता मृत्यू झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!