पुण्यात हिट अँड रनचा थरार; भरधाव कारने दुचाकीस्वार माय -लेकांना उडवले


पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात “हिट अँड रन”चा पुन्हा एकदा भयंकर प्रकार समोर आला असून, एका भरधाव कारने दुचाकीस्वार माय-लेकांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर आई जखमी झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयूर रमेश पिंपळे (वय २८, रा. आनंदपार्क, भैरवनगर, धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात मयूर याची आई गंभीर जखमी झाली. दुचाकीस्वार मयूर आणि त्याची आई हे आनंदपार्क परिसरातून १८ जुलै रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव कारने यांच्या दुचाकीला धडक दिली.या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.. अपघातानंतर कार चालक पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मयुर एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो आईला घेऊन बाहेर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!