कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक बदल, पेट्रोल- डिझेल महागणार? मोदी सरकारने केला मोठा प्लॅन, जाणून घ्या….


इस्रायल- इराण यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचा दर २ टक्के वाढून प्रति बॅरल ७७.२७ डॉलरवर पोहोचला. तेल निर्यातदार देशांची संघटना ओपेकचा सदस्य असलेला इराण तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची निर्यात होते. यामुळे कच्च्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. इराणच्या संसदेने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे दरात बदल होणार आहे.

इराणने यापूर्वीही अशाच प्रकारचा इशारा दिला होता. पण सामुद्रधुनी बंद केली नव्हती. आता अजून तणाव वाढला तर इराणकडून कमी आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सामुद्रधुनीतील तेल साठे आणि पाइपलाइनला लक्ष्य केले जाऊ शकते. यानंतर परिस्थिती अजूनच बिघडणार आहे.

त्यांच्याकडून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी टँकर अथवा किनारी बंदरांवर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इराणच्या या नाकाबंदीमुळे जगभरातील तेलाच्या किमती वाढू शकतात.

युरोपमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतातील पेट्रोल-डिझेलचे दरही आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून आहेत. भारत देशांतर्गत एकूण मागणीच्या ८० टक्के तेल आयात करतो. यामुळे जर परिस्थिती बिघडली तर मात्र अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.

दरम्यान, कच्चे तेल महागल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी दरावर होऊ शकतो. यामुळे देशात महागाई वाढू शकते. देशात दररोज ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर केला जातो. यातील १५ लाख ते २० लाख बॅरल तेलाचा होर्मुझ सामुद्रधुनीतून पुरवठा होतो. यामुळे इतर मार्गांचा विचार केंद्र सरकार करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!