Hindkesari Manya : हिंदकेसरी मन्याच्या दशक्रिया विधीला तुफान गर्दी! अनेकांच्या डोळ्यात पाणी, तुझ्यासारखा कोणी होणे नाही….

Hindkesari Manya : गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात आधिराज्य गाजविणारा सप्तहिंदकेसरी मन्या बैलाचे दुःखद नुकसान झाले. खेड तालुक्यातील वाफगाव येथे मन्या बैलाचा दहा दिवसांपुर्वी अंत्यविधी झाला होता.
या बैलाच्या दशक्रिया विधीसाठी पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांसह चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे या बैलाच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.
या लोकांच्या डोळ्यांसमोरून मन्या बैलाचा प्रवास जात होता. राजू जवळेकर यांनी पोटच्या लेकराप्रमाणे मन्या बैलाला संभाळले होते. बैलगाडा घाटात धावणाऱ्या मन्याचे अनेक रेकॉर्ड त्यानेच मोडले. लाखोंची बक्षिसे त्याने मिळवली.
हा बैल आपल्यातून हरपल्याच्या भावना व्यक्त करत मन्याचा पुतळा उभारला आहे. मन्या बैलाचे २६ फेब्रुवारीला निधन झाले होते. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. अंत्यसंस्कारानंतर त्याच्या दशक्रिया विधीलासुद्धा मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत प्रेमींनी गर्दी केली होती. Hindkesari Manya
दरम्यान, या दशक्रिया विधीला पुणे, अहमदनगर, साताऱ्यासह राज्यातून मन्या बैलावर प्रेम करणारे बैलगाडा शर्यत शौकिन उपस्थितीत होते. मन्या बैलाला २००६ मध्ये पहिल्यांदा गाड्याला जुंपले होते.
मन्याने आतापर्यंत १५० दुचाकी, ६० बुलेट, २ ट्रॅक्टर, २ बोलेरो, १ थार, १ स्कॉर्पिओ यासह लाखोंची बक्षीसे मिळवली. अनेकजण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबत होते. यामुळे आता अनेकांना दुःख झाले आहे.