‘अरे मामा जरा जपून ‘ काय बोलताय लक्षात ठेवा ‘सरळ करायला वेळ लागणार नाही ‘ शरद पवारांचा भरणेमामांना भरसभेत इशारा ….!!

इंदापूर : बारामती लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची आज सांगता सभा झाल्या आहेत. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटल्याने आरोप -प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. सांगता सभेत काही भावनिक चित्र तर काही ठिकाणी विकासाचे मुद्दे प्रचारात आले होते. काही करुन लढत जिंकायची असा प्रचार व रणनीती बारामतीत दोन्ही बाजूंनी आखली जात आहे. आज मात्र शरद पवार हे या युद्धात पाठिमागे राहिले नसून त्यांनी इंदापूरचे आमदार दत्तमामा भरणे यांना धमकी वजा इशारा सभेत देऊन टाकला आहे.


आज इंदापूरच्या सभेत त्यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना थेट धमकीचा इशारा दिला आहे . शरद पवार म्हणाले, “अरे मामा जरा जपून,काय बोलतोय हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही..” असं वक्तव्य शरद पवार यांनी करुन भरणेंना थेट इशारा दिला आहे.
त्याचबरोबर यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ” जर कोणी सत्तेचा गैरवापर असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या..काही लोकांना सत्तेचा माज चढला आहे. असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.