क्रूरता नाही असहायता! आईने ३ वर्षांच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधलं, व्हायरल विडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले…


पुणे : महाबळेश्वर तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या 3 वर्षाच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवण्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या परिस्थितीमुळे अनेकांचे मन सुन्न झाले आहे.

आईच्या या कृतीमागे क्रूरता नसून असहायता आणि गरीबीचा आक्रोश आहे. सदर महिला रोजंदारीवर मजुरी करत असून, कामावर असताना आपल्या लहानग्याची काळजी घेणारे कोणीच नसल्यामुळे त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने ही पद्धत अवलंबली.

दरम्यान, ती महिला सांगते की, तिचा मुलगा अजून बोलूही शकत नाही आणि त्याच्यावर कोणताही वैद्यकीय उपचारही झाला नाही. आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची आहे की, मुलाला घरात एकटं सोडणं तिच्यासाठीही असह्य झालं होतं.

हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख व्यक्त होत आहे. अनेकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. स्थानिक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी पुढे येऊन या कुटुंबाला मदत करावी, अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे शासनाच्या आणि समाजाच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली गेली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!