शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते राहणार बंद?.. जाणून घ्या!..
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी सोमवारी जगभरात साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहात ही साजरी केली जाणार आहे. अशातच शिवजंती निम्मित पुणे सारख्या मोठ्या शहरात आपल्याला मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे शिवजयंतीला पुण्यातील मध्यभागी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
शोभायात्रेमुळे प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर, केळकर व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोभायात्रा संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे.
मात्र वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गायी मार्गाची सोय करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग –
– जिजामाता चौक येथुन शिवाजी रस्ता वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
– गणेश रस्ता – दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक – दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल.
– केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकते नुसार वळविण्यात येणार आहे
-मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतुन वळविण्यात येईल.
-पुरम चौकातुन बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालक पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.
-मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
-मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
– मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे न जाता येणार नाहीत. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जावे.
-स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जाता येईल.