पश्चिम महाराष्ट्रात ५ ते १५ सष्टेंबर पर्यंत दमदार पाऊस! उरुळीकांचन येथील कार्यक्रमात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज ..!

उरुळी कांचन : सप्टेंबर ५ ते १५ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे डक यांच्या विधानाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहणार आहेत.

उरुळी कांचन (ता.हवेली ) येथे कस्तुरी मंगल कार्यालयात उरुळी कांचनचे माजी सरपंच कै.सुभाष कांचन पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या आयोजित कार्यक्रम प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डक हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमात गरजूंना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच शारीरिक तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.
पंजाबराव डक म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व वाढते तापमान रोखण्यासाठी वृक्ष लावगड व संवर्धन मोहीम प्रत्येक गाव व वाड्या वस्त्यावर राबविण्याची नितांत गरज आहे.

त्यामुळे जमिनीची धूप होणार नाही व अवकाळी पाऊस होणार नाही. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी मान्सून परतीच्या काळात अधिक सक्रिय राहणार असून पश्चिम महाराष्ट्रात ५ ते १५ सष्टेंबर पर्यंत दमदार पाऊस कोसळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, भविष्यात पडणारा अवकाळी पाऊस, त्यातून होणारे शेती पिकांचे नुकसान, यासह अधिकाधिक उतारा देणारे सोयाबीनचे वाण, या विषयावर त्यांनी माहिती दिली.
दरम्यान कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती मंगलदास बांदल, हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा.के.डी कांचन , हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर , यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, राजेंद्र टिळेकर,रघुनाथ चौधरी, माजी जि.प. सदस्य अशोक कसबे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन,सरपंच भाऊसाहेब कांचन , माजी उपसरपंच सुनील कांचन, जितेंद्र बडेकर, सुनील द.कांचन, डॉ. समीर ननावरे यांच्या सह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात समाजात असामान्य कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये १११ वेळा रक्तदान करणाऱ्या उरुळी कांचन येथील राजेंद्र बडेकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.