पती पत्नी और वो! बायकोच्या हत्येप्रकरणी जेलवारी भोगली, ३ वर्षांनी ती पुन्हा जिवंत दिसली अन् सगळा राडाच झाला….

कर्नाटक : एक विचित्र घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे कोणत्याही चित्रपटातील कहाणीसारखी घडली आहे. कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तिचे अंत्यसंस्कार केले. मात्र तिच्या हत्येचा दोष त्याच्यावरच ठेवण्यात आल्याने त्याने तीन वर्षांचा तुरुंगवास देखील भोगला.
मात्र अखेर पुराव्याअभावी तो तुरुंगातून बाहेर आला . बाहेर येताच त्याला त्याची पत्नी प्रियकरासोबत हातात हात घालून फिरताना दिसली. या घटनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील कोडागू जिल्ह्यात घडली आहे.
या जिल्ह्यातील एका गावात एक जोडपे आनंदाने वास्तव्य करत होते. मात्र २०१९ मध्ये त्याचि पत्नी अचानक गायब झाली. तो अनेक दिवस तिचा शोध घेत होता. मात्र एक दिवशी त्याला त्याच्या पत्नीच्या अनैतिक प्रेम प्रकर्णविषयी माहिती मिळाली आहे.
मात्र आपल्या मुलांसाठी तु परत ये अशी विनंती पतीने आपल्या पत्नीला केली. मात्र ती परत आली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाली असे वाटल्याने २०२१ ने पत्नीविरुद्ध हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, २०२२ मध्ये पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलावून त्याच्या पत्नीचा मृतदेह मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर पती आणि त्याची सासू त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले. मृतदेह म्हणजे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. त्यानंतर पतीने त्याच्या पत्नीचा अंत्यसंस्कार देखील केले.
मात्र काही काळाने पोलिसांनी आणि प्रशासनाने त्या पतीलाच पत्नीच्या मारल्याच्या आरोपात दोषी ठरवले. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात आले. मात्र त्यानंतर त्याला त्याची पत्नी दुसऱ्यासोबत फिरताना दिसली आहे.
त्यानंतर त्या मृतदेहाची डीएनए टेस्ट करण्यात आली आणि एक वेगळेच सत्य समोर आले. तो मृतदेह त्याच्या पत्नीचा नव्हताच. त्यानंतर त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. मात्र या चुकीमुळे त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. जेव्हा त्याला त्याची पत्नी जिवंत आहे कळले तेव्हा तयाचा विश्वासच बसला नाही.
त्या व्यक्तीच्या मित्रांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला एक हॉटेलमध्ये चेक इन करताना पाहिले. त्यामुळे ती जिवंत आहे हे पतीला समजले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या बायकोचा आणि तिच्या प्रयकरांचा फोटो पतीला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीच्या बायकोला कोर्टसमोर हजर करण्यात आले.