मित्रांना घरी पाठवून पत्नीवर नको तेच करायला लावायचा, परदेशात बसून व्हिडिओ पाहायचा, धक्कादायक घटनेने सगळेच हादरले..

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पती मित्रांना घरी पाठवून त्यांना महिलेवर लैंगिक अत्याचर करायला लावायचा. तो याचा व्हिडिओही बनवायचा, असाही आरोप महिलेने केला आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे सर्व सुरु असल्याचंही महिलेने सांगितलं. अखेर या हताश झालेल्या महिलेने न्यायासाठी एसएसपीकडे दाद मागितली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. महिलेने सांगितले, तिचा नवरा सौदी अरेबियात काम करतो, तिथून फोन करून त्याला त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो.
ती महिला आता एक महिन्याची गरोदर आहे. पीडित महिलेने गुलावठी, बुलंदशहर येथील तरुणाशी लग्न केले. त्यांना चार मुलंही आहेत. तिचा नवरा सौदी अरेबियात काम करतो. तो वर्षभर घरी येत नाही. तीन वर्षांपूर्वी तिचा नवरा घरी आला होता, तो त्याच्या मित्रांना सोबत घेऊन आला होता.
यावेळी त्याने मित्रांना पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने याला विरोध केला असता पतीने सांगितलं की ते माझे मित्र आहेत, मला पैसे देत आहेत. त्यांना वाटेल तसं करु दे, त्यांना एन्जॉय करू दे असं सांगून त्याने हे काम जबरदस्ती करायला लावले.
तसेच जर तू नकार दिलास तर मी तुला घटस्फोट देईन आणि तुला सोडून देईन. नंतर पतीने त्याच्या मित्राला जबरदस्तीने बेडरुममध्ये आणले आणि मित्राने महिलेवर जबरदस्ती केली. यामुळे महिला या सगळ्या गोष्टींना वैतागली होती. मात्र ती अनेक दिवस गप बसली.
नवरा परदेशात गेला तरी हे कृत्य सुरूच होते. यामुळे ही महिला वैतागली यामुळे तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करून सगळ्या गोष्टी सांगितल्या. आरोपी मित्रांच्या मोबाईलमध्ये तिच्या सोबत केलेल्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ देखील होते.