कौटुंबिक वादातून पत्नीचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर केला व्हायरल; पतीविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे पती सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईने जबरदस्तीने लावून दिले लग्न; आईला अटक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४० वर्षीय पतीविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि तिचा पती मार्केट यार्ड भागात राहायला आहेत.

पुणे जिल्ह्यातील या ; गावांतील जमीनदारांचे नशीब बदलणार, भूसंपादन झाल्यावर दोन दिवसांत मिळणार पैसे
मिळालेल्या माहिती नुसार, कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित केली. पत्नीविषयी अश्लील मजकूर प्रसारित केला.आरोपी पतीने पत्नी आणि तिच्या आईला धमकावून वेळोवेळी सात लाख रुपये घेतले. पतीचे अनैंतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पत्नीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करत आहेत.