पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः जवळीक बंदुकीतून गोळ्या घालून केली आत्महत्या ! पोलिस निरीक्षक , कर्मचाऱ्यांनी मानसिक छळ केल्याचा मेसेज ….!!


गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस खात्यातील अधिकारी व काही सहकाऱ्यांच्या मानसिकत्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या एसएलआर रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (दि.१७) घडली आहे.

राकेश पांडुरंग भांडारकर (वय -३७, पदमपूर, ता- आमगाव, जि- गोंदिया असे गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्ह्याचा वरिष्ठ पातळीवर तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,गोंदिया जिल्ह्यात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या राकेश भांडारकर हे बिरसी विमानतळ कामानिमित्त हजर होते. त्याठिकाणी ते ड्युटीवर असताना पोलिस निरीक्षक व इतर कर्मचारी मानसिक दृष्ट्या त्रास देत
असल्याने तणावात जाऊन कर्मचारी सहकारी त्यांना मानसिक त्रास देत होते. त्यामुळे तणावात असलेल्या राकेश भांडारकर यांनी स्वतः जवळील असलेली एसएलआर रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली.

दरम्यान राकेश भांडारकर यांनी बहीण अरूणा भांडारकर यांच्या मोबाईलवर एक मॅसेज टाकला आहे. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांचे नाव टाकण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!