Haveli : हवेलीतील जुन्या नेतेमंडळीवर तालुक्याचा विश्वासच नाहीच! या संस्थांच्या यापूर्वीचा कारभारावरुन जळजळीत सवाल…!!
जयदिप जाधव
Haveli उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी २७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तालुक्यातील जुन्या नेत्यांनी बैठका घेऊन प्रयत्न सुरू केले आहे.
मात्र प्रत्यक्षात छुप्या रितीने पॅनेलची बांधणी मात्र पध्दतशीरपणे आहे. मात्र या सर्व घडामोडीत कारखान्याचे प्रत्यक्ष मालक असलेल्या सभासदांना व वारसांना या जुन्या नेतेमंडळींच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाटतोय काय? या मुद्द्याला या निवडणूक प्रक्रियेत कुठलेही स्थान मिळत नसून सोशल मिडीया व जनतेच्या चर्चासत्रांत जनतेचा विश्वास गमवित चालला असल्याची जळजळीत प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहे.
हवेली तालुक्यातील सहकारी संस्था असो स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणूकांत तालुक्यातील गत तीन दशके ही एकमेकांचे पाय ओढण्यात गेली आहे. या सर्व राजकारणाला चिकटून राहिलेल्या नेतेमंडळी ना तालुक्याला समर्थ पर्याय दिला ना? तालुक्याला राजकीय दिशा? त्यामुळे हवेली तालुक्यातील आज जी सहकार क्षेत्र उजाड होण्याची वेळ ती कोणामुळे आली ही उत्तरे आता सुज्ञ तालुक्यातील मंडळी या नेतेमंडळीवर प्रश्न उपस्थित करुन माघत आहे. आज ही मंडळी तालुक्याची अस्मिता म्हणून भाषा करीत आहेत. मात्र ज्यावेळी या संस्थांना मदतीची अपेक्षा होती. त्यावेळी मात्र ही मंडळी राज्यातील राज्यकर्त्यांच्या सोईचा राजकारणाचा परिपाक झाली होती काय? असाही प्रश्न नागरीक विचारीत आहे. Haveli
तालुक्यातील यापूर्वी झालेल्या सहकारी संस्थांच्या हवेली बाजार समिती व कारखाना निवडणूक यातून तालुक्याने काय बोध घ्यावा? अशी परिस्थिती या संस्थांच्या लचकेतोड वृत्तीतून झाली आहे. या संस्था चाराऊ कुरण आहे काय अशा स्थितीतून भवितव्याकडे ऐवजी बघण्याऐवजी ओरबडण्याकडे असलेल्या धोरणांनी दोन्ही संस्थांवर शासन नियुक्त समितीने चालविण्याची वेळ तालुक्यावर कोणी आणली? याची उत्तरे तालुका माघत आहे. तालुक्यातील बाजार समितीची निवडणूकीला १ वर्षे झाली मात्र वर्षानंतर संचालक मंडळातील हेवेदावे पुढे आले आहे आहेत. एकसंध कारभार करुन बाजारसमितीचा लौकिक वाढेल अशी अपेक्षा असताना थेट गुन्हेगारी वृत्तीने कारभार करण्याची नवी पध्दत तालुक्याला पहायला मिळत आहे.
हिच अंधाधुंदी कारखाना कारभारात झाली असून संचालक मंडळावर कलम ८८ ची वसुली कारवाई, बरखास्तीची कारवाई तीच मंडळी आता जनतेच्या समोर कारखाना विश्वासूपणा दाखविण्याचा प्रयत्न करीत असली तरी जनतेतून मात्र या मंडळीवर अविश्वास दाखवून तीव्र शब्दांत टिकाटिप्पणी सुरू आहे.
वरिष्ठांना कात्रजचा घाट दाखविण्यात माहिर…!
हवेली तालुक्यातील नेतेमंडळींनी सर्वपक्षीय वरिष्ठ नेते मंडळीशी सलगी राहून भरपूर काही मिळविल्याची चर्चा तालुक्यात अनेकदा होत आहे. मात्र या नेतेमंडळींना देण्याची वेळ आली की ही मंडळी पुढचा पर्याय शोधतात अशी खासियत आहे. राज्य सरकार बदलतात तशी ही मंडळी त्या सरकारमधील नेते मंडळींना जवळ करतात असा इतिहास आहे. या तालुक्यातील एका शिक्षण संस्थेला एक बडा नेता ४० कोटी परत २२ कोटी देण्याची दानशूरता दाखवितो. मात्र त्या नेत्याला त्या पदरी काय मिळते? अशी उद्विग्नता नेता बोलून दाखवितो. अशी आवस्था तालुका पाहत आहे.