Haveli : यशवंत कारखान्याच्या निवडणुकीत रथी महारथी रिंगणात, दोन तुल्यबळ पॅनेलमध्ये निवडणूक रंगणार..!!
जयदीप जाधव
Haveli उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असफल ठरले असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार( दि.२७) दिवशी निवडणुकीत दोन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून काही माजी संचालकांसह नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूकीची रंगत वाढली आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याची तब्बल १५ वर्षांनंतर पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे.गेल्या १३ वर्षांपूर्वी अर्थिक भागभांडवला अभावी हा कारखाना बंद अवस्थेत आहे. तत्कालीन २०१०-११ च्या गळीत हंगामात संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई झाल्यानंतर या कारखान्यावर सलग १३ वर्षे प्रशासकराज येऊन संस्था शासन अधिपत्याखाली कार्यरत होती. त्यानंतर काही सभासदांनी न्यायालयात जाऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार निवडणुकीचा १५ वर्षानंतर कार्यक्रम जाहीर झाला आहे. Haveli
त्यानुसार या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी मागील महिनाभर बैठका घेऊन प्रयत्न केले होते. त्यानुसार ३२० उमेदवारी अर्ज हे दाखल होऊन निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा असताना मंगळवार दि.२७ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरीस दोन पॅनेलची घोषणा झाली आहे.
दरम्यान या कारखान्यासाठी कारखान्याचे काही माजी संचालक व प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. या प्रमुख उमेदवारांत माजी उपाध्यक्ष रोहिदास उंद्रे, राजीव घुले, सुभाष जगताप, बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ काळभोर ,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, पुणे आडते फूल बाजार संघटनेचे माजी अध्यक्ष एम.एस.चौधरी, भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन, सुनिल कांचन, नवनाथ काकडे , अमित कांचन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन,दौंड पंचायत समितीचे माजी सभापती सुशांत दरेकर आदी प्रमुख रिंगणात आहेत.
निवडणूकीत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल तर हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप, संचालक प्रशांत काळभोर, माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी घोषणा झाली आहे.
या कारखान्यासाठी ९ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.
उमेदवारांची यादी व पॅनेल पुढीलप्रमाणे :-
आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल
गट क्र १ उरुळीकांचन
१) कांचन अजिंक्य महादेव(उरुळीकांचन)
२) कांचन अमित भाऊसाहेब(उरुळीकांचन)
३) आतकिरे विकास विलास (बोरी भडक)
गट क्र २ सोरतापवाडी .
१) चौधरी राजेंद्र रतन(नायगाव )
२) चौधरी मारुती सिताराम(सोरतापवाडी)
३) कानकाटे लोकेश विलास (कोरेगावमूळ)
गट क्र ३ लोणीकाळभोर.
१) काळमोर आप्पासाहेब रंगनाथ (लोणीकाळभोर)
२) काळभोर राहुल मधुकर(लोणीकाळभोर)
३) काकडे नवनाथ तुकाराम(थेऊर)
गट क्र ४ फुरसुंगी -मांजरी बुद्रुक
घुले राजीव शिवाजीराव (मांजरी बुद्रुक)
कामठे सुरेश फकिरराव (फुरसुंगी)
गट क्र ५ लोहगाव -केसनंद
१) उंद्रे रोहिदास दामोदर (मांजरी खूर्द )
२) पवार आनंदा देवराम (कोलवडी )
गट क्र. ६.वाडेबोल्हाई
१) कोतवाल शामराव सोपाना (अष्टापूर)
२) गावडे दिपक कुशाबा (वाडेबोल्हाई )
उत्पादक सह संस्था विगर उत्पादक संस्था व पणन ‘ब’ वर्ग
काळभोर सागर अशोक (लोणीकाळभोर )
महिला राखीव
१) घुले सुरेखा मधुकर (मांजरी बुद्रुक )
२) काळभोर संगिता सखाराम (लोणीकाळभोर )
अनुसुचित जाती जमाती
वेताळ संतोष दत्तात्रय (हिंगणगाव)
इतर मागास वर्गीय
टिळेकर रोहिदास गोविंद (टिळेकरवाडी)
विमुक्त जाती / भटक्या जमाती । विमाप्र
थोरात मारुती किसन (खामगाव टेक )
आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी उमेदवार :-
ट क्र. १ उरुळीकांचन.
दरेकर सुशांत सुनील (सहजपूर )
कांचन संतोष आबासाहेब (उरुळीकांचन)
कांचन सुनील सुभाष (उरुळीकांचन)
गट क्र.२ सोरतापवाडी
चौधरी शशिकांत मुरलीधर (सोरतापवाडी)
चौधरी विजय किसन (नायगाव)
कोलते ताराचंद साहेबराव (कोरेगावमूळ)
गट क्र.३ लोणीकाळभोर
काळभोर अमर उद्धवराव (लोणीकाळभोर)
काळभोर योगेश प्रल्हाद (लोणीकाळभोर)
काळे मोरेश्वर पाडुरंग (थेऊर)
गट क्र.४ फुरसुंगी -मांजरी
हरपळे अमोल प्रल्हाद (फुरसुंगी)
घुले राहुल सुभाष (मांजरी बुद्रुक)
गट क्र.5 लोहगाव-केसनंद
उंद्रे किशोर शंकर (मांजरी खुर्द)
गायकवाड रामदास सीताराम (कोलवडी )
गट क्र.६ वाडेबोल्हाई-
जगताप सुभाष चंद्रकांत (अष्टापूर)
गोते रमेश जगनाथ (बिवरी)
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी
नाव
गायकवाड संजय सोपानराव (मुंढवा)
अनुसूचित जाती, जमाती
शिंदे दिलीप नाना (वाडेबोल्हाई)
महिला राखीव प्रतिनिधी
काळभोर हेमा मिलिंद (लोणीकाळभोर)
काळभोर रत्नाबाई माणिक (लोणीकाळभोर)
इतर मागास वर्गीय प्रतिनिधी
म्हेत्रे मोहन खंडेराव (सहजपूर)
भटक्या/जाती जमाती प्रतिनिधी
थोरात कुंडलीक अर्जुन (हिंगणगाव)