हवेली बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला,अंतिम यादी प्रसिद्ध ! अजित पवार यांची उद्या राष्ट्रवादी च्या पॅनेलसाठी बैठक…!

पुणे : 19 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हवेली बाजार समितीच्या निवडणुकीचे धुमशान लवकरच सुरू झाले आहे. याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी प्रसिद्ध केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बाजार समितीसाठी 18 संचालकांच्या निवडणुकीसाठी 17 हजार 746 इतके मतदार आहेत. यामुळे इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार अडते-व्यापारी मतदारसंघात आहेत.
त्यांची संख्या 13 हजार 174 इतके आहे. अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन संचालक बाजार समितीवर निवडून दिले जातात. मात्र, एकूण मतदारांच्या 74 टक्के मतदार हे याच मतदारसंघात असल्याने सर्वाधिक चुरशीची निवडणूक या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे.
याबाबत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी एक सभा घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एकच पॅनेल करण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाचे अनेक जण इच्छुक असल्याने अजित पवार यांच्याशी मुंबईत चर्चा झाली. सर्वांना विश्वासात घेऊन या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एकच पॅनल करावा, अशी तयारी सध्या सुरू आहे.