कर्ज घेतलंय? मग ही बातमी वाचाच! ‘या’ बँकेने व्याजदर वाढवले, आता खिशाला किती बसणार झळ?


मुंबई : आजच्या वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी अनेकजण बँकेकडून कर्ज घेतात. अशा परिस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून गृहकर्ज किंवा इतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एसबीआयने काही कर्जांशी संबंधित व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांच्या ईएमआयवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

SBI ने कोणते व्याजदर वाढवले?

एसबीआयने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) ७.५० टक्क्यांवरून ७.७५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. म्हणजेच या दरात ०.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरासोबत CRP जोडला जाईल. ज्या ग्राहकांचे कर्ज या दराशी जोडलेले आहे, त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात बदल होऊ शकतो.

याशिवाय, बँकेने काही कालावधींसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्येही वाढ केली आहे. एक वर्षाचा MCLR ८.७० टक्क्यांवरून ८.८५ टक्क्यांपर्यंत, तर तीन महिन्यांचा दर ८.२५ टक्क्यांवरून ८.४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

सहा महिन्यांचा MCLR ८.७५ टक्क्यांपर्यंत, तर तीन वर्षांचा दर ८.९५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, एक महिन्याचा आणि ओव्हरनाइट MCLR ७.८५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

कर्जाचा EMI वाढणार का?

एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (EBLR) ७.९० टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या दरातही ०.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये CRP आणि BSP यांचाही समावेश असेल.

व्याजदरातील या बदलांचा परिणाम प्रत्येक ग्राहकाच्या कर्जावर सारखाच होईल असे नाही. कर्ज कोणत्या बेंचमार्कशी जोडलेले आहे, कर्जाच्या अटी काय आहेत आणि व्याजदर बदलण्याची तारीख कोणती आहे, यावर ईएमआय किंवा कर्जाचा कालावधी बदलू शकतो.

नवीन दर कधीपासून लागू?

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन दर १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले आहेत. त्यामुळे एसबीआयकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांनी आपल्या कर्जाचा प्रकार आणि लागू व्याजदर तपासणे महत्त्वाचे आहे. ईएमआयमध्ये बदल झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी बँकेची अधिकृत अधिसूचना किंवा कर्ज खाते तपासावे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!