माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का? अजित पवार असं का म्हणाले? शेतकरी आक्रमक….


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. दौंडमध्ये कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का? असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. यामुळे कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता आणि शेतकरी कर्जमाफी यांसारख्या काही मोठ्या घोषणांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर मात्र याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत.

दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापित होऊन बरेच दिवस पूर्ण झाले असल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात विचारणा होऊ लागली आहे. मात्र अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या बाबतीत संभ्रम अवस्था तयार झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढू लागली आहे.
दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणालेत की, माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?, मी जेवढी भाषणं केली, तुला एक माहिती आहे का?

तसेच ते म्हणाले, आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात राज्याचा गाडा आपल्याकडे आहे. आता या विधानामुळे महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की नाही हा सवाल उपस्थित होतोय. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकरी नाराज झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!