Harshvardhan Patil : मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील यांचा अखेर भाजपला रामराम, मुलगा राजवर्धन पाटील यांच्याकडून अधिकृत घोषणा…

Harshvardhan Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे.
याचपार्श्वभूमीवर आता एक मोठी माहिती समोर आली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र व निरा भिमा सहकारी साखर कारखाने संचालक राजवर्धन पाटील यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे स्टेटस ठेवल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे. Harshvardhan Patil
दरम्यान, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रवेश करणार हे अनेक दिवसापासून चर्चा होती मात्र पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी चर्चेला पूर्णविराम दिला असून त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे आता समोर येत आहे.