Harshvardhan Patil : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर दिली महत्वाची जबाबदारी, बड्या संस्थेवर केली निवड…


Harshvardhan Patil इंदापूर : राज्याचे माजी सहकारमंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर सदस्यपदी निवड झाली आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा अनुभव बघता हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी दिल्याने इंदापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा अनेक घडामोडी बघायला मिळणार आहेत. मंत्री अमित शाह हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

याबाबत हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीबाबत भारत सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने प्रसिद्ध केली. यामुळे आता त्यांची जबाबदारी वाढली आहे. या संस्थेचे भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशभर पुण्यासह १८ विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज केले जाते. Harshvardhan Patil

याबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. यामध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत सहकारी तत्वावर कृषी उत्पादने, अन्नपदार्थ वस्तू, पशुधन आणि उत्पादने यांच्यावर प्रक्रिया, साठवणूक, निर्यात आणि आयात आणि निर्यात करणे तसेच रुग्णालय, आणि शिक्षणातील काही उत्पादने आणि सेवा यांचे यांचे नियोजन केले जाते.

तसेच देशातील विविध प्रकारच्या सहकारी संस्था, साखर उद्योग यांना सहाय्य करणे आणि त्यांच्या आर्थिक पायाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय विकास महामंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे नेतृत्वाखाली काम करते. या निवडीनंतर हर्षवर्धन पाटीलचे अभिनंदन केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!