माळेगावची निम्मी मतमोजणी पूर्ण! अजित पवार गट 8 तर तावरे यांची 1 जागेवर आघाडी, 400 मतांच्या आघाडीमुळे उत्सुकता शिगेला, पहाटेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार…


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः हा उमेदवारी घेऊन राज्यात चर्चेत केलेल्या  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी अर्धी पूर्ण झाली आहे. पहाटे संपूर्ण मतमोजणीनंतर एकूण वीस जागांचा निकाल घोषित होणार असल्याने या निवडणुकीची उत्कंठा पहाटेपर्यंत ताणली जाणार आहे. या अर्धा टप्प्यावर झालेल्या मतमोजणीत अजित पवार गट आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनेल मध्ये जोरदार टक्कर  सुरू आहे. यामध्ये अजित पवार पॅनेलचे आठ उमेदवार ४०० ते ५०० मतांनी पुढे असल्याने अर्धावरील टप्प्यात निकाल कुठच्या बाजूला झुकणार म्हणून उत्सुकता ताणली गेली आहे.

 

चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलच्या एक महिला आघाडीवर आहेत. तर अजित पवार यांच्या पॅनेलचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत. या उमेदवारांत राखीव जागांसह महिला गटात चंद्रराव तावरे यांनी जोरदार लढत दिल्याने उत्कंठा शिगेला पोहचली आहे. अजूनही निम्मे मतदान मोजायचे असून यामुळे काहीही निकाल कुठे फिरणार म्हणून शक्यतांचा बाजार तेजीत आहे.

 

सकाळी’ ब’  वर्ग गटातून अजित पवार यांनी विजयी सुरुवात केल्यानंतर सर्व जागांच्या ऊस उत्पादक गटांत अजित पवार यांचे ८ उमेदवार आघाडीवर आहे. तर महिला गटात चंद्रराव तावरे यांचा १ उमेदवार सर्वाधिक मते घेऊन आघाडीवर आहे.

 

मतपत्रिकेवर क्रॉस व्होटींग झाल्याने मतमोजणीत वेळ लागत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय घडणार म्हणून उत्सुकता वाढली आहे. अजित पवार यांच्या पॅनेलचा ४०० ते ५०० मताधिक्याचा फरक असल्याने हे लीड मोडीत निघणार अशी अपेक्षा आहे. तर अजित पवार समर्थक बहुमताने विजयी होतील असा दावा सुरू झाला आहे. मात्र पहाटेपर्यंत सर्वांना निकालाची वाट पहावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!