Hadapsar : हडपसर ते उरुळीकांचन उड्डानपूलाचा डिपीआर कागदावरच! हडपसर ते उरुळीकांचन इलिव्हेटेड उड्डानपूलाचे लग्नाआधीच घातले बारशे! लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांनी डिपीआर पूर्ण केल्याची दाखविली वचनबद्धता..!!


जयदिप जाधव

Hadapsar उरुळीकांचन : वाहतुकीसाठी प्रचंड धोकादायक असलेला तसेच वाहतुक कोंडीनी सतत त्रस्त असलेल्या पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते उरुळीकांचन अथवा यवत या दरम्यानच्या मार्गावर परदेशी धर्तीवर बांधकाम स्थापत्य शैलीच्या स्तरावर बांधण्यात येणाऱ्या स्वप्नवत इलिव्हेटेड उड्डानपूलाची दिड वर्षापूर्वी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने अधिसूचना काढून कासवगतीने डीपीआरचे काम सुरू असलेल्या या डीपीआरचा अंतिम डीपीआर तयार होण्यापूर्वीचलोकसभेच्या काही उमेदवारांनी तसेच राजकीय पक्षांनी या कामाचे केविलवाणा श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे लग्नाआधीच बारसे घालण्याचा प्रकाराने याकामाची चांगलीच थट्टा उडविण्याचा प्रकार घडत आहे.

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते उरुळीकांचन पर्यंत वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यादरम्यान महामार्गावर वाढलेले शहरीकरण तसेच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच या मार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी पर्यंतचा विकासित झालेल्या चौपदरीकरण महामार्गाची टोलवसुलीची मर्यादा ३१ मार्च २०१९ रोजी संपली आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात हा महामार्ग वर्ग करुन घेण्यात झालेला विलंब व स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार व आमदारांनी केला नसलेल्या पाठपुराव्याने पाच म्हणजे २०२४ वर्षापर्यंत हा महामार्ग प्रचंड धोकादायक व वाहतुक कोंडीने त्रस्त होऊन बसला आहे. Hadapsar

केंद्रीय रस्ते व महामार्ग प्राधिकरण मंत्रालय व या खात्याशी संबंधित कार्यालयाने १० ऑक्टोबर २०२२ रोजी हडपसर ते यवत अथवा उरूळीकांचनअसा प्रस्तावित महामार्ग विकसित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गेली दिड वर्ष या रस्त्याच्या डिपीआरचे काम करीत आहे.

परंतु हे डिपीआरचे काम अद्याप प्रलंबित आहे.ते काम कधी पूर्ण होईल हे कुठल्या अर्थिक वर्षात पूर्ण होईल याची रुपरेषा ठरली नसताना लोकसभेच्या निवडणुकीत काही उमेदवार व पक्षांनी डिपीआर हा अंदाजपत्रक ४०४७ कोटी प्रस्तावित असल्याचा शोध लावून हे कामपूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे भासवून देत असल्याने जनतेला स्वप्नवत प्रकल्पाचे गोड गाजर दाखविल्याचा प्रकार सुरू केला आहे.

२०१९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांत पुणे – शिरुर या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाबरोबर पुणे- सोलापूर महामार्गावरील कवडीपाट ते उरुळीकांचन दरम्यान उड्डानपूलाची वचनबद्धता व अश्वासने देऊ केली आहे. मात्र पाच उलटूनही ठराविक अपवादात्मक एका लोकप्रतिनिधीने पाठपुरावा सोडला तर फारसे गांभीर्य दाखविले नाही. मात्र आता हे महामार्ग चांगले तुंबून नागरीकांना त्रस्त करुन टाकत असल्याने काही उमेदवारांनी व पक्षांनी डिपीआरचे घोंगडे भिजत असताना श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने ‘ये पब्लिक है ये सब जाणती है’ हे म्हणण्याची वेळ आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!